पहा: धोनीच्या त्या स्टंपिंगचा विडिओ व्हायरल !

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीचा श्रीलंका दौऱ्यातील यष्टिचित करतानाचा एक विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अँजेलो मॅथ्यूजला एकमेव टी२० सामन्यात जेव्हा धोनीने यष्टिचित केले तो हा विडिओ आहे.

आपल्या वेगवान आणि धूर्त यष्टिरक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या धोनीने पुन्हा एकदा आपल्या यष्टिरक्षणाने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. डोळ्याची पाती लवते न लवते तोच धोनीने मॅथ्यूजला असा काही यष्टिचित केला की काय झाले यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घ्यावी लागली.

६व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर युझवेन्द्र चहल गोलंदाजी करत असताना हा चेंडू मॅथ्यूजला काही खेळता आला नाही. परंतु पाठीमागे उभ्या असलेल्या यष्टीरक्षक धोनीने कुणाच्या काही लक्षात येण्याच्या आधीच त्याला यष्टीचित केले होते. फक्त प्रतीक्षा ही तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची होती. मॅथ्यूज सुद्धा या स्वतःबद्दल साशंक होता.

ही पूर्ण कृती सेकंदाच्या काही भागात झाली. स्लोव मोशनमधील विडिओ पहिला असता धोनीने अतिशय चपळाईने चेंडू पकडून लगेच स्टंपवरील बेल्स खाली पाडल्या. तिसऱ्या पंचांनी निर्णय भारताच्या बाजूने दिला. अगदी काही मिलीमीटरच्या फरकाने मॅथ्यूज बाद झाला होता.

यानंतर धोनी चाहत्यांनी ट्विटरवर अनेक ट्विट करून धोनीच्या चतुराईचे कौतुक केले.

धोनीच्या त्या स्टंपिंगचा विडिओ व्हायरल !