पहा एमएस धोनीचा साधेपणा…

एमएस धोनी त्याच्या साधेपणाची ओळख आता त्याच्या चाहत्यांना नवीन नाही. कधी आपल्या लाडक्या कुत्रांबरोबर खेळताना तर कधी मित्रांबरोबर रांचीमध्ये फेरफटका मारतानाचे असंख्य व्हिडिओ आजपर्यंत आपण सोशल मीडियावर पहिले आहेत. असाच एक नवा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र दिसत आहे तो म्हणजे एमएस धोनी इम्रान ताहिरच्या मुलगा गुबरानशी पुणे एअरपोर्टवर खेळताना.

एमएस धोनी गुबरानशी चक्क जमिनीवर बसून खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ एमएस धोनीच्या फॅन क्लबने मोठ्या प्रमाणावर ट्विटरवर शेअर केला आहे.

 

एमएस धोनी पुण्याकडून खेळत असल्याकारणाने पुढील सामन्यासाठी तो रवाना होत असताना पुणे एअरपोर्टवर हा व्हिडियो घेतला आहे. तांत्रिक कारणामुळे पुण्याच्या आयपीएल टीमला विमानतळावर बराच वेळ थांबावे लागले. त्यामुळे मोकळ्या वेळेत एमएस धोनीने इमरानचा मुलगा गुबरानशी खेळण्यात तसेच मस्ती करण्यात घालवले.