…म्हणून अगरवाल, पंतला मिळाली २०१९ विश्वचषकासाठी टीम इंडियात संधी

रविवारी (21 जूलै) बीसीसीआयने पुढील महिन्यात होणाऱ्या भारतीय संघाच्या विंडीज दौऱ्यासाठी वनडे, टी20 आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहिर केला आहे. भारतीय संघाची घोषणा करताना निवड समीती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केले आहे.

यावेळी त्यांनी इंग्लंड आणि वेल्समध्ये नुकत्याच पार पडलेल्या 2019 विश्वचषकादरम्यान भारतीय संघात रिषभ पंत आणि मयंक अगरवालला बदली खेळाडू म्हणून संधी देण्यामागील कारणांचाही उलगडा केला आहे.

2019 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या हाताच्या अंगठ्याला चेंडू लागला. त्यामुळे त्याला या विश्वचषकातून बाहेर पडावे लागले. त्याच्याऐवजी उर्वरित विश्वचषकात केएल राहुलने सलामीला फलंदाजी केली. तर त्याचा बदली खेळाडू म्हणून रिषभ पंतला संधी देण्यात आली.

त्यानंतर भारतीय संघाच्या सरावादरम्यान जसप्रीत बुमराहचा चेंडू अष्टपैलू खेळाडू विजय शंकच्या पायाच्या अंगठ्याला लागला. त्यामुळे त्यालाही विश्वचषकातून बाहेर जावे लागले. त्याच्याऐवजी बदली खेळाडू म्हणून सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालची निवड करण्यात आली.

या निवडीबद्दल रविवारी प्रसाद यांनी सांगितले की ‘निवडीबद्दल एक धोरण आहे की विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धांदरम्यान मी पत्रकार परिषद घेत नाही, ज्यामुळे अनेक अफवा निर्माण होऊ शकतात.’

रिषभ पंतच्या निवडीबद्दल प्रसाद म्हणाले, ‘जेव्हा शिखर धवन दुखापदग्रस्त झाला तेव्हा आमच्याकडे केएल राहुल हा राखीव सलामीवीर होता. त्यावेळी वरच्या फळीत डावकरी फलंदाज नव्हता.’

‘संघ व्यवस्थापनाने डावकरी फलंदाजासाठी विनंती केली होती. त्यामुळे आमच्याकडे रिषभ पंतशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आम्हाला त्याची क्षमता माहित आहे. आम्ही डावकरी फलंदाज(पंत) संघात घेण्याचे हे कारण आहे.’

तसेच मयंक अगरवालच्या निवडीबद्दल पुढे प्रसाद म्हणाले, ‘त्यानंतर, जेव्हा विजय शंकर दुखापतग्रस्त झाला तेव्हा आम्ही सलामीवीर फलंदाजाची(अगरवालची) निवड का केली हा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे गोंधळ झाला.’

‘पण इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात केएल राहुल क्षेत्ररक्षण करताना पाठीवर पडला होता आणि नंतर तो मैदानात आला नव्हता. त्यामुळे ही काळजीची गोष्ट होती. त्यावेळी मेल लिहिला गेला की आम्हाला राखीव सलामीवीर फलंदाज हवा आहे.’

‘त्यामुळे आम्ही काही सलामीवीर फलंदाज पाहिले. काही फॉर्ममध्ये नव्हते आणि काही दुखापतग्रस्त होते. त्यामुळे आम्ही मयंक अगवालची निवड केली.’

या विश्वचषकात रिषभ पंतला 4 सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याने या 4 सामन्यात 29 च्या सरासरीने 116 धावा केल्या. तर मयंकला मात्र या विश्वचषकात एकाही सामन्यात भारताच्या 11 जणांच्या संघात संधी मिळाली नाही.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा. 

महत्त्वाच्या बातम्या –

एकवेळ या क्रिकेटपटूसाठी भांडला होता गंभीर, आता त्याला मिळाली टीम इंडियात संधी

तो क्रिकेटमधील सोनेरी दिवस ना लंकेचे चाहते विसरले ना भारतीय फॅन…

नवदीप सैनी, राहुल चहर पाठोपाठ पुण्याचा हा युवा क्रिकेटपटूही ठोठावतोय टीम इंडियाचे दार