निवड समिती कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक शात्रींच्या हातातील खेळणं

एमकेएस प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीमध्ये विराट कोहली आणि रवि शास्त्री यांच्या निर्णयाला आव्हान देण्याइतपत अनुभव नसल्याची टीका निवड समितीेचे माजी मुख्य सदस्य सईद किरमानी यांनी केली आहे.

करूण नायर आणि मुरली विजय यांनी निवड समितीमध्ये संवादाचा अभाव असल्याचे आरोप केले होते. त्या दोघानांही संघातून का वगळण्यात आले याचे कोणतेही कारण दिले नव्हते. त्या पार्श्वभुमीवर किरमानी बोलत होते.

प्रशिक्षक, कर्णधार आणि संघातील वरिष्ठ खेळाडू चर्चा करून आपल्याला कश्या प्रकारचा संघ हवा आहे. हे निवड समितीला कळवत असतात.

”सध्याची निवड समिती रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्यापेक्षा कमी अनुभवी आहे. त्यामुळे ते संघ व्यवस्थापनाला काय हवे आहे, हे ते चांगल्या पद्धतीने ऐकतात.” असे 68 वर्षीय माजी मुख्य निवड समितीचे सदस्य सईद किरमानी यांनी सांगितले आहे.

पाच सदस्यीय निवड समितीला खुप कमी अनुभव आहे. त्यामध्ये मुख्य सदस्य एमकेएस प्रसाद हे फक्त 6 कसोटी आणि 17 वन-डे सामने खेळले आहेत. उर्वरित सदस्यांपैकी सरनदीप सिंग (2 कसोटी आणि 5 वन-डे), देवांग गांधी( 4 कसोटी आणि 3 वन-डे), जतीन परांजपे (4 वन-डे) आणि गगन खोडा (2 वन-डे) यांनाही फारसा अनुभव नाही.

”संघ निवडताना नशिब हे देखिल महत्वाचे आहे. माझ उदाहरण घ्या माझ्या उभारी घेण्याच्या काळात मला 1986 मध्ये  वि़डिंजविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून वगळ्यात आले होते.” असेही किरमानी यांनी सांगितले.

किरमानी यांनी 88 कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.

महत्वाच्या बातम्या-