एमएसएलटीए अखिल भारतीय टेनिस स्पर्धेत कैवल्य कलमसे, कपिश खांडगे, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर, प्रगती सोलनकर, एकता इंगळे  यांचा मुख्य फेरीत प्रवेश

पाचगणी: रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या  एमएसएलटीए रवाईन हॉटेल अखिल भारतीय मानांकन  3लाख रकमेच्या पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत पुरुष गटात कैवल्य कलमसे, कपिश खांडगे, मेघभार्गव पटेल यांनी तर, महिला गटात बेला ताम्हणकर, प्रगती सोलनकर, एकता इंगळे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत दुसऱ्या मानांकित पुरुष गटात मेघभार्गव पटेलने मैत्रेय भगतचा 6-1, 6-4असा तर, कैवल्य कलमसेने मोहन गोविंदचा 6-3, 6-1असा पराभव केला. कपिश खांडगे याने अमन शेट्टीवर टायब्रेकमध्ये 7-6(3), 6-3असा पराभव करून मुख्य फेरी गाठली.

महिला गटात चौथ्या मानांकित प्रगती सोलनकरने भाविका गुंडेचाला 6-2, 6-1असे पराभूत केले.पी विदिशा रेड्डीने पाचव्या मानांकित शर्मिन रिझवीचा 6-1, 6-2असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला.

बेला ताम्हणकरने सहाव्या मानांकित प्रगती सोलनकरचा 7-5, 6-1असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.

एकता इंगळे वि.वि.साक्षी चुग 7-5, 6-3.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी: पुरुष गट:

तीर्थ माचीला(1)वि.वि.अभिषेक शुक्ला 6-4, 6-1;

मेघभार्गव पटेल(2)वि.वि.मैत्रेय भगत 6-1, 6-4;

मौलीन आघरा(3)वि.वि.अनय पाटील 6-1, 6-1;

हर्षित बंसल(4)वि.वि.संदेश कुरळे 6-1, 6-1;

कैवल्य कलमसे वि.वि.मोहन गोविंद  6-3, 6-1;

रोहिण गजरी(6)वि.वि.मोहनदास अंतरिष्क 6-4, 6-3;

कपिश खांडगे वि.वि.अमन शेट्टी 7-6(3), 6-3;

महिला गट: संहिता चमर्थी(1)वि.वि.कल्लूरी लालित्या रेड्डी 6-2, 6-0;

अँजेला रमण(3)वि.वि.वैदेही काटकर 6-2, 6-1;

प्रगती सोलनकर(4)वि.वि.भाविका गुंडेचा 6-2, 6-1;

पी विदिशा रेड्डी वि.वि.शर्मिन रिझवी(5) 6-1, 6-2;

बेला ताम्हणकर वि.वि.प्रगती सोलनकर(6) 7-5, 6-1;

एकता इंगळे वि.वि.साक्षी चुग 7-5, 6-3.