भारतीय मानांकन 3लाख रकमेच्या पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत साहिल गवारेचा मानांकित खेळाडूवर विजय

पाचगणी । रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए रवाईन हॉटेल अखिल भारतीय मानांकन 3लाख रकमेच्या पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत पुरुष गटात महाराष्ट्राच्या साहिल गवारे याने मानांकित खेळाडूवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत पुरुष गटात बिगरमानांकीत साहिल गवारे याने तिसऱ्या मानांकित जयेश पुंगलियाचा 6-3, 6-1असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला. अव्वल मानांकित पश्चिम बंगालच्या ईशाक इकबाल याने क्वालिफायर महाराष्ट्राच्या कैवल्य कलमसेचा टायब्रेकमध्ये 6-4, 7-6(4)असा पराभव केला. क्वालिफायर मेघभार्गव पटेलने मिहीर औटीचा 6-2, 6-1असा तर, महाराष्ट्राच्या अरमान भाटियाने पंजाबच्या हरदीप संधूचा 7-5, 6-3असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. मध्यप्रदेशच्या सातव्या मानांकित यश यादवने कुणाल वझिरानीचा 5-7, 6-4, 6-2असा तीन सेटमध्ये पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: पुरुष गट:
ईशाक इकबाल(पश्चिम बंगाल)(1)वि.वि.कैवल्य कलमसे(महा) 6-4, 7-6(4);
कोसाराजू सिवादीप(आंध्रप्रदेश)वि.वि.आकाश नंदवाल(मध्यप्रदेश) 7-5, 7-5;
तीर्थ माचीला वि.वि.राजन गुहन 6-3, 7-6(6);
यश यादव(मध्यप्रदेश)(7)वि.वि.कुणाल वझिरानी 5-7, 6-4, 6-2;
अनुराग नेनवानी(दिल्ली)(4)वि.वि.करण लालचंदानी(महा) 6-0, 6-0;
गॅरी टोकस(दिल्ली)वि.वि.कपिश खांडगे(महा) 7-6(4), 7-5;
मौलीन आघरा वि.वि.उमेर शेख(आंध्रप्रदेश) 5-7, 6-4, 6-2;
मोहम्मद फहाद(तामिळनाडू)(5)वि.वि.प्रणित कुदळे(महा) 6-2, 6-2;
अरमान भाटिया(महा)वि.वि.हरदीप संधू(पंजाब) 7-5, 6-3;
मनवीर रंधावा(महा)वि.वि.अनय पाटील(महा) 6-3, 7-6(5);
साहिल गवारे(महा)वि.वि.जयेश पुंगलिया(महा)(3) 6-3, 6-1;
मेघभार्गव पटेल(महा)वि.वि.मिहीर औटी(महा) 6-2, 6-1.