एमएसएलटीए-योनेक्स सनराईज ११व्या रमेश देसाई मेमोरिअल कुमार राष्ट्रीय(१६ वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत गिरीश चौगुले, मानव जैन, संस्कार जसवाणी, अर्जुन गोहड यांची आगेकूच 

0 81

पुणे, २० मे २०१७: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) आणि पीएमडीटीए यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए-योनेक्स सनराईज ११व्या रमेश देसाई मेमोरिअल कुमार राष्ट्रीय(१६ वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात गिरीश चौगुले, मानव जैन, संस्कार जसवाणी, अर्जुन गोहड या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.

 

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात पहिल्या पात्रता फेरीत अनिश लालने  सिद्धांत भुवनतचा ९-३ असा तर, गिरीश चौगुलेने  इंद्रजीत बोराडेचा ९-२ असा पराभव करून आगेकूच केली. मानव जैन याने  शशांक नरडेवर  ९-५ असा विजय मिळवला. संस्कार जसवाणी याने संजीत देवीनेणीचा टायब्रेकमध्ये ९-८(१) असा पराभव केला. अर्जुन गोहड व प्रसन्ना बागडे यांनी अनुक्रमे  काफील कडवेकर व अमृतजय मोहंती यांचा ९-४ अशा सारख्याच फरकाने पराभव केला.

 

मुलींच्या गटात रिया भोसले हिने मृण्मयी भागवतचा ९-० असा तर, मुलींच्या गटात ईला दाढेने तेन्झीन मेंडिसचा ९-३ असा पराभव करून आगेकूच केली.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी: मुले: 

अनिश लाल वि.वि.सिद्धांत भुवनत(१६)९-३;

गिरीश चौगुले वि.वि.इंद्रजीत बोराडे ९-२;

दीपक वायरा वि.वि. सार्थक शेरावत ९-१;

मानव जैन वि.वि.शशांक नरडे(१०)९-५;

अर्चित सिन्हा वि.वि.अनर्घ गांगुली ९-०;

संस्कार जसवाणी वि.वि.संजीत देवीनेणी ९-८(१);

ओंकार आपटे वि.वि.चैतन्य चौधरी(१३)९-०;

हितेश येलमनचिली वि.वि. आरव साने ९-७;

अर्जुन गोहड वि.वि.काफील कडवेकर ९-४;

प्रसन्ना बागडे वि.वि.अमृतजय मोहंती ९-४;

मुली: 

अवी शहा वि.वि.मैथिली मोटे ९-०;

रिया भोसले वि.वि.मृण्मयी भागवत ९-०;

ईला दाढे वि.वि.तेन्झीन मेंडिस ९-३;

हिमाद्री कश्यप वि.वि.दिविजा गोडसे ९-७;

सागरिका सोनी वि.वि.ख़ुशी घोडे ९-४;

ख़ुशी अगरवाल वि.वि.तेजस्विनी देशमुख ९-०.

Comments
Loading...
%d bloggers like this: