एन्ड्युरन्स प्रिमिअर कॉर्पोरेट लीग क्रिकेट 2019 स्पर्धेत हनीवेल, त्रिशा एंटरप्रायझेस संघांची विजयी सलामी

पुणे। ई2डी स्पोर्ट्स यांच्या तर्फे आयोजित एन्ड्युरन्स प्रिमिअर कॉर्पोरेट लीग क्रिकेट 2019 स्पर्धेत साखळी फेरीत हनीवेल, त्रिशा एंटरप्रायझेस या संघांनी अनुक्रमे इक्यु टेक्नॉलॉजीक व बीएमएफ या संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

ई2डी क्रिकेट मैदान, लवळे येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पूल ब गटात पहिल्या सामन्यात सुशान मुदलेर(नाबाद 101धावा)याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर हनीवेल संघाने इक्यु टेक्नॉलॉजीक संघाचा 8 गडी राखून पराभव करत शानदार सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना जुनेद सय्यद नाबाद 27, अमर गजभीये 23, रोहन पाटील 20यांनी केलेल्या धावांच्या जोरावर इक्यु टेक्नॉलॉजीक संघाने 20षटकात 8बाद 127धावा केल्या. हनीवेलकडून प्रमोद बारावकर(3-8), मछिंद्र शेगर(2-34)यांनी केलेल्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर इक्यु टेक्नॉलॉजीक संघाला 127धावांवर रोखले. हे आव्हान हनीवेल संघाने 11.5षटकात 2 बाद 131धावा करून पूर्ण केले.यात सुशान मुदलेरने 50 चेंडूत 9 चौकार व 8षटकारांच्या मदतीने नाबाद 101धावांची शतकी खेळी करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला.

दुसऱ्या सामन्यात पूल क गटात सौरभ सिंग ( नाबाद 28धावा व 3-17)याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर त्रिशा एंटरप्रायझेस संघाने बीएमएफचा 5 गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली. स्पर्धेचे उदघाटन ई2डी स्पोर्ट्सचे कुमार ठक्कर , स्वप्निल चिखले आणि निलेश एकतपुरे यांच्या हस्ते करण्यात आले

स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी:
पूल ब: इक्यु टेक्नॉलॉजीक: 20षटकात 8बाद 127धावा(जुनेद सय्यद नाबाद 27(15), अमर गजभीये 23(25), रोहन पाटील 20(29), प्रमोद बारावकर 3-8, मछिंद्र शेगर 2-34)पराभूत वि.हनीवेल: 11.5षटकात 2 बाद 131धावा(सुशान मुदलेर नाबाद 101(50,9×4,8×6), ज्ञानेश्वर राठोड 1-13);सामनावीर-सुशान मुदलेर;

पूल क: बीएमएफ: 15.1षटकात सर्वबाद 80धावा(अमित उंबरीकर 27(36), प्रसाद हिराळकर 11(11), महेश भट 10, सौरभ सिंग 3-17, नवनाथ साठे 2-18, रुपेश काळे 2-20)पराभूत वि.त्रिशा एंटरप्रायझेस: 15.3षटकात 5बाद 81धावा(संतोष पडवळ 30(26,3×4,2×6), सौरभ सिंग नाबाद 28(45), महेश भट 3-7, गिरीश ओक 2-21);सामनावीर-सौरभ सिंग.