भारतीय गोलंदाजामुळेच भारतीय संघ येणार कसोटी सामन्यात अडचणीत!

भारत-अफगाणिस्तान यांच्यात गुरूवारपासून एक कसोटी सामन्याची मालिका सुरू होत आहे. हा कसोटी सामना अफगाणिस्तानचा पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना असेल.

या पहिल्या कसोटी सामन्यासाठी अफगाणिस्तानचे खेळाडू फार उत्साही आहेत. या कसोटी सामन्याच्या पार्शभूमीवर अफगाणिस्तानचा युवा फिरकीपटू मुजिब उर रेहमानने या सामन्यात ते पूर्ण क्षमतेने खेळ करूण चांगली कामगीरी करन्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.

तसेच तो म्हणाला, “आयपीयलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळताना मला आर. अश्विनचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच आयपीयल दरम्यान मला अश्विनने मिस्ट्री बॉल शिकवला आहे. त्याचा उपयोग करून मी भारतीय फलंदाजांना नक्कीच अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करणार आहे.”

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये मुजिबने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यामध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर त्याने अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवले होते.

आयपीयलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून 2018 च्या मोसमात 11 सामन्यात 6.99 इकोनॉमीने 14 बळी मिळवले होते.

हा कसोटी सामना अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना असला तरी, अलिकडच्या काळात त्यांनी मर्यादित षटकांच्या सामन्यात चांगिली कामगिरी केली आहे.

तसेच या सामन्यासाठी अफगाणिस्तान संघात फिरकीपटूंची फौज आहे. यामध्ये मुजिब उर रेहमानसह राशिद खान, मोहम्मद नबी आणि रहमत शाह यांचा समावेश आहे.

भारतीय संघाने या गोलंदाजांची अलिकडची कामगिरी लक्षात घेऊन यांना कमी लेखण्याची करु नये. या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली नसल्याने कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे असेल.