२१व्या शतकात जन्म झालेला १६ वर्षीय क्रिकेटपटू करणार आंतरराष्ट्रीय पदार्पण

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आयर्लंड दौऱ्यासाठी १५ सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. ज्यात १६ वर्षीय मुजीब झर्दन या फिरकी गोलंदाजाला संधी देण्यात आली आहे.

जर त्याला आयर्लंड विरुद्ध पदार्पणाची संधी मिळाली तर २१व्या शतकात जन्म झालेला तो पहिला क्रिकेटपटू ठरणार आहे. मुजीब झर्दनने एसीसी अंडर १९ स्पर्धेत अफगाणिस्तानला कडून विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्यामुळे त्याची निवड या संघात करण्यात आली आहे.

शारजाह येथे होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेत अफगाणिस्तान संघ आयर्लंडविरुद्ध ३ सामने खेळणार असून त्याला अलोलोझ्य जिनसेंग एनर्जी कप असे नाव देण्यात आले आहे. हे सामने ५ ते १० डिसेंबर या काळात होणार आहे.

स्पर्धेचे वेळापत्रक
पहिला वनडे – ५ डिसेंबर
दुसरा वनडे – ७ डिसेंबर
तिसरा वनडे– १० डिसेंबर