पुण्यात आयपीएल सामने घेतायं, पण पाण्याचं नियोजन कसं करणार आहात?

पुणे । पुण्यात आयपीएल २०१८चे ६ सामने होणार आहेत. हे सामने सुरू व्हायला जेमतेम आठवडा राहिला असतानाही अनेक संकटे समोर आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र क्रिकेट असोशियशनला याबद्दल विचारणा केली आहे. जर पुण्यात हे सामने होणार अाहेत तर मैदानाच्या देखभालीयाठी जे पाणी लागणार आहे त्याचे तूम्ही काय नियोजन केले आहे असा प्रश्न कोर्टाकडून विचारण्यात आला आहे.

आजच पुण्यातील आयपीएलचे प्ले आॅफचे दोन सामने अन्य शहरात हलवण्यात आल्याचे वृत्त असताना आता जे ६ सामने पुण्यात होणार आहे त्यावरही टांगती तलवार आहे.

सध्या महाराष्ट्र राज्यात पाणीप्रश्न ऐरणीवर अाहे. त्यात चेन्नईतील सामने हेही पाणीप्रश्नामूळेच पुण्यात हलवण्यात आले आहेत. त्यामूळे पाणीप्रश्न पेटला असताना न्यायालयाने केलेल्या विचारणेनंतर या सामन्यांवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

पुण्यातील आयपीएल प्ले-आॅफ सामने दुसऱ्या शहरात हलवणार