रणजी ट्रॉफी: बडोदा विरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईचा संघ जाहीर

सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या पाचव्या फेरीत होणाऱ्या बडोदा विरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईचा संघ जाहीर झाला आहे. मुंबईचा फलंदाज श्रेयश अय्यर सध्या भारतीय संघातून खेळत असल्याने त्याच्या ऐवजी आदित्य तारेकडे कर्णधारपद कायम ठेवण्यात आले आहे.

तसेच सध्या न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या मालिकेत भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे भारतीय संघात निवड न झाल्याने तो सध्या रणजी स्पर्धेत खेळत आहे. त्याचीही या सामन्यासाठी निवड झाली आहे. परंतु त्याची श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली असल्याने रणजी स्पर्धेच्या ६ व्या फेरीसाठी तो अनुपलब्ध असेल.

हा सामना मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडिअमवर होणार असून हा मुंबईचा ५०० वा सामना असणार आहे. मुंबई संघ हा ५०० सामने खेळणारा पहिलाच संघ ठरणार आहे. याबरोबरच विशेष म्हणजे याच दिवशी युवा फलंदाज पृथ्वी शॉ आपला १८वा वाढदिवस साजरा करणार आहे.

मुंबई संघ : अजिंक्य रहाणे, धवल कुलकर्णी, अभिषेक नायर, आदित्य तारे (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, अखिल हेरवाडकर, शार्दूल ठाकूर, सिद्धेश लाड, आकाश पारकर, विजय गोहिल, पृथ्वी शॉ, श्रेवास इव्हर, जव बिस्ता, सुफीवान शेख, आदित्व धुमाळ,रोवस्तान डायस.