पाच चेंडूत पाच षटकारांची बरसात करणारा मुंबईकर झाला कोट्याधीश

जयपूर। 2019 चा आयपीएल लिलाव आज(18 डिसेंबर) जयपूरमध्ये सुरु आहे. यामध्ये सुरुवातीपासूनच धक्कादायक बोली पहायला मिळाल्या.

यावर्षी रणजी ट्रॉफीमध्ये पाच चेंडूत पाच षटकार मारणाऱ्या अष्टपैलू शिवम दुबेला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (आरसीबीने) तब्बल पाच कोटी रुपयांची बोली लावत संघात घेतले आहे. त्याची मुळ किंमत केवळ 20 लाख एवढी होती.

रणजीमध्ये मुंबई विरुद्ध बडोदा संघात झालेल्या सामन्यात दुबेने मुंबईकडून खेळताना दुसऱ्या डावात फिरकी गोलंदाज स्वप्निल सिंगच्या षटकात हे पाच षटकार मारले होते. यावेळी त्याने 60 चेंडूमध्ये 76 धावा केल्या. यात त्याने सात षटकार आणि तीन चौकार मारले आहे.

शिवमने मुंबई टी20 लीगमध्ये प्रविण तांबेच्या गोलंदाजीवरही पाच षटकार खेचले आहे. यावेळी त्याने अंतिम षटकात 26 धावांची गरज असताना 22 धावा केल्या होत्या. त्याने प्रथम श्रेणीमध्ये सहा सामन्यात खेळताना 567 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 22 विकेट्स घेतल्या असून त्यात कर्नाटक विरुद्ध 53 धावा देत 7 विकेट्स यांचाही समावेश आहे.

आयपीएल लिलावात मागीलवर्षी सर्वात महागडा ठरलेला वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला यावर्षीही मोठी बोली लागली असून त्याला राजस्थान रॉयल्सने 8 कोटी 40 लाख रुपयांची बोली लावत संघात परत घेतले आहे. तर वरूण चक्रवर्थीलाही 8 कोटी 40 लाख रुपयांची बोली लावत किंग्ज इलेवन पंजाबने संघात घेतले आहे.

तसेच युवराज सिंग, ब्रेंडन मॅक्यूलम, ख्रिस वोक्स या स्टार खेळाडूंवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाने बोली लावलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या:

आयपीएल २०१९ लिलाव: २०१८ला सर्वात महागड्या ठरलेल्या खेळाडूला यावर्षीही मिळाली तितकीच मोठी किंमत

कोहली-पेन वादाबद्दल बीसीसीआयने केला मोठा खुलासा

Video: इशांत शर्मासाठी ‘पार्ट-टाइम अंपायर’ झाला नॅथन लायन