मुंबई शहर कबड्डी असोसिएशनची जिल्हास्तरीय पंच परीक्षा

मुंबई शहर कबड्डी असो. च्या विद्यमाने रविवार दि. २४ मार्च २०१९ रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत भारतीय क्रीडा मंदिर वडाळा येथे जिल्हास्तरीय पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिक्षेकरिता उजळणी वर्ग शनि. दि.१६ मार्च रोजी सायं. ७ ते ९ आणि रविवारी सकाळी १० ते सायंकाळपर्यंत घेण्यात येणार आहेत.

या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या परिक्षार्थीनी त्वरित दीपक मसुरकर – ९८६९४६४४९४ किंवा सूर्यकांत देसाई – ९८६९००३२२८ यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आपले नाव सशुल्क नोंदणी करावे. असे आव्हान या परिपत्रकाद्वारे जिल्हा संघटनेचे सचिव विश्वास मोरे यांनी केले आहे.

उजळणी वर्ग: शनिवार १६ मार्च, सायं. ७ ते ९ आणि रविवार १७ मार्च, सकाळी १० ते सायंकाळ पर्यत

परीक्षा दिनांक: २४ मार्च २०१९

परीक्षा वेळ: सकाळी ९ ते १ वाजता.

परीक्षा ठिकाण: भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा

संपर्क:
दीपक मसुरकर – ९८६९४६४४९४
सूर्यकांत देसाई – ९८६९००३२२८