मुंबई इंडियन्ससाठी आजचा ऐतिहासिक सामना, जाणून घ्या कारण

मुंबई। आज आयपीएल 2019 मध्ये 27 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. हा सामना मुंबई इंडियन्ससाठी ऐतिहासिक सामना आहे.

मुंबई इंडियन्स आज टी20 क्रिकेटमधील 200 वा सामना खेळत आहे. त्यामुळे 200 टी20 सामने खेळणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला आहे. तसेच त्यांनी सर्वाधिक टी20 सामने खेळणाऱ्या संघामध्ये सोमरसेट या इंग्लिश कौउंटी क्रिकेट या संघाला मागे टाकले आहे. सोमरसेटने आत्तापर्यंत 199 टी20 सामने खेळले आहेत.

मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत 2008 पासून 199 सामन्यामध्ये 112 सामन्यात विजय आणि 84 सामन्यात पराभव स्विकारले आहेत. तसेच सोमरसेटने 2003 पासून 95 सामन्यात विजय आणि 92 सामन्यात पराभव पत्करले आहे.

सर्वाधिक टी20 सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत मुंबई इंडियन्स आणि सोमरसेट पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर 194 सामन्यांसह हॅम्पशायर आहे. तर चौथ्या स्थानावर 188 सामन्यांसह रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आहे आणि पाचव्या क्रमांकावर 187 सामन्यांसह ससेक्स आणि कोलकता नाईट रायडर्स आहेत.

आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

रोहित शर्मासाठीही आजचा सामना खास – 

मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार रोहित शर्माचा आजचा सामना हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून 100 वा सामना आहे. आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून रोहित 95 व्या सामन्यात नेतृत्व करत आहे. तसेच त्याने चॅम्पियन्स लीग टी20 मध्ये 5 सामन्यात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले आहे.

सर्वाधिक टी20 सामने खेळणारे संघ – 

200 सामने –  मुंबई इंडियन्स

199 सामने – सोमरसेट

194 सामने – हॅम्पशायर

188 सामने – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

187 सामने – ससेक्स/ कोलकता नाईट रायडर्स

महत्त्वाच्या बातम्या –

रोहित शर्माचे मुंबई इंडियन्समध्ये पुनरागम, असा आहे राजस्थान रॉयल्स विरुद्ध ११ जणांचा संघ

‘नो बॉल’ विवाद प्रकरणी सौरव गांगुलीचा एमएस धोनीला पाठिंबा…

 चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध बेन स्टोक्सने घेतला अफलातून झेल, पहा व्हिडिओ