अशी असेल मुंबई इंडियन्सची नवीन जर्सी

आयपीएलच्या ११ मोसमाला आता काहीच दिवस उरले आहेत. त्यामुळे आयपीएलच्या चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघ सर्वात यशस्वी संघ राहिला आहे. यामुळेच या संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

मुंबईने कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २०१३, २०१५ आणि २०१७ असे तीन मोसमात विजेतेपद मिळवले आहे. पण आता हा संघ यावर्षीच्या मोसमात मात्र नवीन जर्सीत दिसणार आहे.

त्यांच्या नवीन जर्सी संदर्भात मुंबई इंडिअन्सच्या ट्विटर अकाऊंवर एक व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये यावर्षी मुंबई इंडिअन्सची नवीन जर्सी कशी असेल हे सांगितले आहे.

मुंबई इंडियन्सने यावर्षी रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांना संघात कायम ठेवले होते. तर कृणाल पंड्या आणि किरॉन पोलार्ड या दोन खेळाडूंना लिलावाच्या वेळी राईट टू मॅच कार्ड वापरून पुन्हा संघात सामील करून घेतले होते.

मुंबई इंडिअन्सचा सलामीचा सामना ७ एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे.