IPL2018- मुंबईची तिसऱ्या सामन्यात जबरदस्त सुरूवात

0 168

मुंबई । आयपीएलच्या ११व्या हंगामातील आपल्या पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेविल्स आज आमनेसामने आले आहेत. हा सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर होत असून दिल्ली डेअरडेविल्सचा कर्णधार गौतम गंभीरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

मुंबईने पहिल्या चार षटकात नाबाद ५१ धावा केल्या आहेत. त्यात सुर्याकूमार यादव आणि लेविस हे दोन खेळाडू सलामीला आले आहेत. त्यात सुर्याकूमार यादव २७ तर लेविस १९ धावांवर खेळत आहे.

मुंबई इंडियन्स पहिला सामना चेन्नईविरूद्ध तर दुसरा सामना हैद्राबाद विरुद्ध पराभूत झाले आहेत. दिल्ली डेअरडेविल्सही पंजाब आणि राजस्थान विरूद्धच्या लढतीत पराभूत झाली आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: