आज जर मुंबई इंडियन्स पराभूत झाली तर…

मुंबई | आज मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज ११ पंजाब हा आयपीएलमधील ५०वा सामना होत आहे. आजचा सामना जिंकणे पंजाब आणि मुंबई संघांना गरजेचे आहे.

आजचा सामना जर किंग्ज ११ पंजाब संघ जिंकला तर त्यांचे १४ गुण होणार आहेत. त्यामुळे त्यांचे प्ले आॅफला पात्र ठरण्यासाठी पुढच्या सामन्यावर अवलंबून रहावे लागेल. परंतु आज जर ते पराभूत झाले तर स्पर्धेतून जवळपास बाहेर होतील.

त्याचवेळी या स्पर्धेत आपले आव्हान जर कायम राखायचे असेल तर मुंबईला आज विजय मिळवावाच लागणार आहे.

मुंबईचे सध्या १२ सामन्यात १० गुण आहेत. या संघासाठी एकच जमेची बाजू आहे आणि ती म्हणजे या संघाचा स्पर्धेतील नेट रनरेट.

+.४०५ हा सर्वात चांगला नेटरनरेट मुंबई इंडियन्स संघाचाच आहे.  त्यामुळे आज जर या संघाने विजय मिळवला तर ते गुणतालिकेत चौथ्या स्थानी येणार आहेत. तसेच आज पंजाबने विजय मिळवला तर तेही चौथ्या स्थानी येऊ शकतात.