पुणे मुंबई संघाला दोन संधी!

कधी नाही एवढी जबदस्त कामगिरी करून पुण्याचा आयपीएल संघ प्रथमच १० वर्षांत आयपीएलच्या प्ले ऑफ फेरीत पोहचला आहे. १४ पैकी ९ सामने जिंकत पुण्याने ही कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्स या आधीच सर्वात जास्त अर्थात १४ पैकी १० सामने जिंकून आयपीएलच्या प्ले ऑफ मध्ये पोहचला आहे. आता प्ले ऑफ चा पहिला सामना पुणे विरुद्ध मुंबई मध्ये १६ मे रोजी होणार आहे.

गेल्या ३९ दिवसातील असंख्य अश्या चढउतार नंतर मुंबई, पुणे हैद्राबाद आणि कोलकाता चे संघ प्ले ऑफमध्ये पोहचले आहे. परंतु मुंबई आणि पुणे हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिल्यामुळे जरी प्रथम सामन्यात हरले तरी अंतिम फेरीत पोहचण्यासाठी या संघांना दुसरी संधी मिळणार आहे. मुंबई आणि पुणे यांच्यातील पहिली लढत हि Qualifier १ असेल. यात जो संघ जिंकेल तो थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. तर पराभूत संघ हा Qualifier २ चा सामना खेळेल. जो १९ मे रोजी असेल. त्यात Eliminator मधून पुढे आलेला संघ अर्थात हैद्राबाद आंबी कोलकाता यांच्यातील विजेता संघ खेळेल.

Eliminator चा राऊंड १७ मे रोजी हैद्राबाद आणि कोलकाता संघात बेंगलोर येथे खेळवला जाईल.

असे होतील आयपीएलचे उर्वरित सामने (प्ले ऑफ लढती)

Qualifier १: मुंबई विरुद्ध पुणे – १६ मे (मुंबई )

Eliminator: हैद्राबाद विरुद्ध कोलकाता – १७ मे (बेंगलोर )

दुसरी Qualifier: विजेता Eliminator vs पराभूत Qualifier १ – मे १९ (बेंगलोर)

अंतिम लढत : विजेता Qualifier १ विरुद्ध विजेता Qualifier २ – २१ मे (हैद्राबाद )