मुंबई महापौर चषक पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा आजपासून

मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धा आजपासून नेहरू नगर कुर्ला येथे रंगणार आहे. या स्पर्धेची गटवारी जाहीर करण्यात आली आहे.
विश्वशांती मंडळ-पालघर विरुद्ध कर्नाळा स्पोर्ट्स-रायगड, संघर्ष मंडळ-उपनगर विरुद्ध शिव ओम्-पुणे आशा महिला, तर युनियन बँक विरुद्ध सेन्ट्रल बँक, मुंबई पोलीस विरुद्ध माझगाव डॉक अशा पुरुष गटातील संघर्षमय लढतीने ” मुंबई महापौर चषक- २०१८” या कबड्डी स्पर्धेला प्रारंभ  होईल.
मुंबई उपनगर कबड्डी असो.च्यावतीने, महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने आणि मुंबई महानगर पालिकेच्या सहकार्याने आज दि.१९मार्च २०१८ पासून व्यावसायिक पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 
मुंबई – नेहरू नगर, कुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे होणारे हे सामने ठीक ५-३०वाजता  सुरू करण्याचा संयोजकांचा मानस आहे. सामने वेळेत सुरू करावयाचे असल्यामुळे सहभाग घेतलेल्या सर्व संघांनी ठीक ४-३०वा. आपली उपस्थिती क्रीडांगणावर राखावी. अशी विनंती संयोजकांच्यावतीने करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे औपचारिक उदघाटन सोम. दि.१९मार्च रोजी सायं. ठीक ७-००वा. मुंबईचे महापौर मा. श्री विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते करण्यात येईल. अध्यक्षस्थानी जिल्हा कबड्डी असो.चे अध्यक्ष खासदार गजानन किर्तीकर, तर अतिथी म्हणून विभागप्रमुख व आमदार संजय पोतनीस, विभागीय आमदार मंगेश कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेची तयारी जवळपास पूर्ण होत आली असून त्यावर शेवटचा हात फिरविला जात आहे. सहभागी संघाची गटवारी टाकण्याचे काम आज पूर्ण करण्यात आले.  ती खालील प्रमाणे-
व्यावसायिक पुरुष संघ : – 
 अ गट :- १) मध्य रेल्वे- मुंबई, २) युनियन बँक – मुंबई, ३) सेन्ट्रल बँक – मुंबई, ४) किंग्ज बिल्डर – उपनगर.
 ब गट :- १) भारत पेट्रोलियम – मुंबई, २) मुंबई पोलीस – मुंबई, ३) माझगाव डॉक – मुंबई, ४) आर के इंजिनीअरींग – उपनगर.
 क गट :- १) महिंद्रा – मुंबई, २) मुंबई महानगर पालिका – मुंबई , ३) मुंबई बंदर – मुंबई, ४) बेस्ट – मुंबई.
 ड गट :- १) देना बँक – मुंबई, २) महाराष्ट्र पोलीस – मुंबई, ३) जे जे रुग्णालय – मुंबई, ४) मुंबई अग्नीशमन दल – मुंबई.
 
महिला संघ :- 
अ गट :- १) महात्मा गांधी – उपनगर, २) विश्वशांती मंडळ – पालघर, ३) कर्नाळा स्पोर्ट्स – रायगड, ४) स्वराज्य क्लब – उपनगर, 
ब गट :- १) शिवशक्ती मंडळ – मुं.शहर, २) संघर्ष – उपनगर, ३) शिव ओम् – पुणे, ४) चिपळूण स्पोर्ट्स – रत्नागिरी.
क गट :- १) राजमाता जिजाऊ – पुणे, २) जय हनुमान – कोल्हापूर, ३) अनिकेत स्पोर्ट्स – रत्नागिरी, ४) अमरहिंद – मुं. शहर.
ड गट :- १) सुवर्णयुग – पुणे, २) मुं. पोलीस – मुं. शहर, ३) एम एच स्पोर्ट्स – पुणे, ४) महात्मा फुले – उपनगर.