मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनची जिल्हास्तरीय पंच परीक्षा

मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या वतीने रविवार दिनांक ९ जुन २०१९ रोजी मुंबई उपनगर जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

पंच परीक्षा साठी दि. ३ ते ८ जुन २०१९ या कालावधीत पंच प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. पंच पंचप्रशिक्षण वर्गास राष्ट्रीय पंच राजेंद्र अनुभवने व प्रविण सावंत याचे मार्गदर्शन लाभणार आहे.

मुंबई उपनगरातील इच्छुक उमेदवारांनी आपले प्रवेश अर्ज पचंपरिक्षा शुल्कासह असो च्या कुर्ला कचेरीत गुरुवार दि. ३१ मे २०१९ पर्यत सादर करावेत. अधिक माहितीसाठी असोसिएशनचे पंच समिती प्रमुख श्री. प्रभाकर लकेश्री यांच्याशी संपर्क साधावा.

उजळणी वर्ग:  ३ जून २०१९ ते ६ जून २०१९

परीक्षा दिनांक: ९ जून २०१९

संपर्क:
श्री. प्रभाकर लकेश्री- ९१६७०८३४५८