वय १६, तरीही कामगिरीच्या जोरावर झाली इंडिया अ’मध्ये निवड

मुंबई । मुंबईच्या अंडर १९च्या संघातून खेळणाऱ्या १६ वर्षीय जेमिमा रोड्रिगेजची इंडिया अ मध्ये निवड झाली आहे. ह्याच महिन्यात औरंगाबाद येथे झालेल्या मुंबई विरुद्ध सौराष्ट्र सामन्यात मुंबईकडून खेळताना जेमिमा रोड्रिगेजने तुफानी फटकेबाजी १६३ चेंडूत द्विशतक केले होते.

जेमिमा रोड्रिगेजने वयाच्या १३व्या वर्षी मुंबईच्या अंडर १९ वर्षीय संघात स्थान मिळवले होते.

अनुजा पाटील या खेळाडूची संघाच्या कर्णधारपदी निवड झाली असून या मालिकेत ३ वनडे सामने होणार आहेत. यावेळी प्रथमच भारतीय महिलांचा अ संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणार आहे.

यावेळी बांगलादेश अ संघ भारत दौऱ्यावर येणार असून हुबळी येथे वनडे लढती तर बेळगाव येथे तीन टी२० लढती होणार आहेत. या मालिकेपूर्वी बांगलादेश संघ अलूर येथे दोन सराव सामने खेळणार आहे.

विशेष म्हणजे मुंबईकर जेमिमा रोड्रिगेजला वनडे आणि टी२० अशा दोन्ही मालिकेत खेळायची संधी मिळणार आहे.