मुंबई विजयाच्या समीप, दिवसाखेर ओडिशा ४ बाद ९३

भुवनेश्वर। ओडिसा विरुद्ध मुंबई संघात सुरु असलेल्या सामन्यात आज तिसऱ्या दिवसाअखेर मुंबई संघाने ओडिसा संघासमोर जिंकण्यासाठी ३२० धावांचे लक्ष ठेवले आहे.

मुंबई संघाने आज ९ बाद २६८ धावांवर आपला डाव घोषित केला. यात सिद्देश लाडने शतकी खेळी केली. ४१२ धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या ओडिशा संघाची दिवसाखेर ४ बाद ९३ अशी अवस्था झाली.

मुंबईकडून धवल कुलकर्णी, विजय गोहिल यांनी प्रत्येकी एक तर आकाश पारकरने २ विकेट्स घेतल्या.

संक्षिप्त धावफलक:
मुंबई पहिला डाव: सर्वबाद- २८९ धावा
ओडिसा पहिला डाव: सर्वबाद- १४५ धावा
मुंबई दुसरा डाव: ९ बाद २६८ घोषित
ओडिशा दुसरा डाव: ४ बाद ९३