शेवटचा सामना जिंकुनही मुंबई होऊ शकते आयपीएलमधून बाहेर

मुंबई | बुधवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज ११ पंजाब सामन्यात मुंबईने ३ धावांनी विजय मिळवला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात ६० चेंडूत ९४ धावा करणाऱ्या केएल राहुलची मात्र चांगलीच निराशा झाली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने २० षटाकांत ८ बाद १८६ धावा केल्या. त्यात पोलार्ड ५० तर कृणाल पंड्या ३२ यांच्या धावांचा समावेश होता. त्यानंतर पंजाबकडून केएल राहुलने ९४ तर अॅराॅन फिंचने ४६ धावा केल्या.

याबरोबर स्पर्धेत मुंबई गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. आता मुंबईचा शेवटचा सामना हा दिल्ली डेअरडेविल्सविरुद्ध २०मे रोजी होत आहे.

मुंबईसाठी प्ले आॅफला पात्र ठरण्याची काही समीकरणे- 

शेवटच्या सामन्यात पराभूत झाली तरी मुंबई होऊ शकते प्ले आॅफला पात्र- 

मुंबईचे सध्या १३ सामन्यात १२ गुण आहेत. सध्या गुणतालिकेत मुंबई, राजस्थान आणि पंजाबचे १२ गुण आहेत आणि प्रत्येक संघाचा एक सामना बाकी आहे. तसेच बेंगलोरचे सध्या १२ सामन्यात १० गुण आहेत. त्यामुळे ज्या संघांचे १२ गुण आहेत ते शेवटचा सामना पराभुत झाले आणि ७व्या स्थानावरील बेंगलोर एक राजस्थान विरुद्धचा सामन्यात जिंकले परंतु हैद्राबाद विरुद्ध पराभूत झाले तर मुंबई शेवटच्या सामन्यात पराभुत होऊनही सरस धावगतीच्या आधारे प्ले-आॅफला पात्र ठरेल.

शेवटच्या सामन्यात विजय मिळवुनही मुंबई होऊ शकते प्ले आॅफमधून बाहेर- 

सध्या गुणतालिकेत मुंबई, राजस्थान आणि पंजाबचे १२ गुण आहेत आणि प्रत्येकी एक सामना बाकी आहे. तसेच बेंगलोरचे सध्या १२ सामन्यात १० गुण आहेत. जर १४ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असलेल्या कोलकाताने हैद्राबादविरुद्ध विजय मिळवला आणि त्याच वेळी जर बेंगलोरने दोन्ही सामन्यात चांगल्या फरकाने विजय मिळवला तर त्यांचेही १४ गुण होतील. त्यामुळे हैद्राबाद, चेन्नई, कोलकाता आणि बेंगलोर हे संघ प्ले-आॅफसाठी पात्र ठरु शकतात.

महत्त्वाच्या बातम्या-

महिलांच्या ऐतिहासिक आयपीएल टी२०साठी संघांची घोषणा

9 दिवसांत केएल राहुलच्या नावावर झाले दोन नकोसे विक्रम

संघ पराभूत झाला, परंतु तो अखेरपर्यंत लढला!

आणि पंड्या-राहुलने केली जर्सीची अदलाबदली, चाहते भावुक!