मुंबई सिटी एफसीच्या खेळाडूंनी दिल्या रणबीर कपूरला जन्मदिनाच्या शुभेच्छा!!

इंडियन सुपर लीग मधील मुंबई सिटी एफसी संघाचा सह मालक रणबीर कपूर याला मुंबई सिटी संघातील खेळाडूंनी जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुंबई सिटी एफसीच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत या संघातील मुख्य खेळाडूंनी रणबीरला जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मुंबई सिटीचा मुख्य डिफेंडर सर्बियन खेळाडू लुसियान गोयन त्याच्या मुलासोबत आपणाला दिसतो. लुसियन गोयन याचा आपल्या संघविषयीचा जिव्हाळा या व्हिडिओमधून दिसतो. लुसियन आणि त्याचा मुलगा लुका हे मुंबई सिटीच्या जर्सीमध्ये दिसतात. यामध्ये लुका मुंबई सिटी संघाला गोल म्हणून चीयर करताना दिसतो.

त्यानंतर मुंबई सिटी संघाचा ब्राझेलीयन मिडफिल्डर लिओ कोस्टा रणबीर कपूर याला जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो. लिओ कोस्टा आणि रणबीर यांच्यात खूप जवळची मैत्री आहे. त्यानंतर भारतीय खेळाडू गोलकीपर अमरिंदर सिंग आणि बलजीत सिंग हे रणबीरला शुभेच्छा देताना दिसतात.

बालजीत सिंग हा भारताचा खूप होतकरू स्ट्रायकर आहे. सुनील छेत्रीनंतर तो भारतीय संघाचा भार आपल्या खांदयावर घेईल असे अनेक फुटबॉल पंडितांची भाकित आहेत. या नवीन मोसमात बालजीत मुंबई सिटी संघासाठी किती महत्वाचा खेळाडू ठरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.