विराट कोहलीने मोडला रिकी पॉन्टिंगचा हा विक्रम

0 299

मुंबई । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड  यांच्यातील पहिल्याच वनडेत कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा ३० शतकांचा विक्रम मोडला. 

विराटने या सामन्यात शतकी खेळी करताना वनडे कारकिर्दीतील ३१ वे शतक झळकावले. याबरोबर वनडेत सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहली आता दुसऱ्या स्थानावर आला आहे. 

हा विक्रम मोडताना विराटने १११ चेंडूत १०० धावा केल्या. यात ७ चौकार आणि १ षटकारचा समावेश होता.

विशेष म्हणजे कारकिर्दीतील २००व्या वनडेत शतकी खेळी करणारा तो एबी डिव्हिलिअर्स नंतरचा केवळ दुसरा खेळाडू आहे.

या यादीत ४६३ वनडेत ४९ शतके करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. 

आपला २००वा वनडे सामना खेळत असलेल्या विराटने शतकी खेळी करताना संघालाही सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. 

ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगने ३७५ सामन्यात ३० शतके केली आहेत. विराटने हा विक्रम मोडताना पॉन्टिंगपेक्षा तब्बल १७५ सामने कमी खेळले आहेत. 

Comments
Loading...
%d bloggers like this: