धुत ट्रान्समिशन पुना क्लब करंडक पुरुष व महिला अखिल भारतीय मानांकन खुल्या टेनिस स्पर्धेत आरती मुनीयनचा मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का

पुणे। पुना क्लब यांच्या तर्फे आयोजित एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या धुत ट्रान्समिशन पुना क्लब करंडक 3लाख रकमेच्या पुरुष व महिला अखिल भारतीय मानांकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला गटात पहिल्या फेरीत तमिळनाडूच्या बिगर मानांकित आरती मुनीयन हीने तेलंगणाच्या पाचव्या मानांकीत हुमेरा शेखचा पराभव करत उदघाटनाचा दिवस गाजवला.

पुना क्लब टेनिस कोर्ट व लेडीज क्लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महिलांच्या गटात पहिल्या फेरीत तमिळनाडूच्या बिगर मानांकीत आरती मुनीयन हीने तेलंगणाच्या पाचव्या मानांकित हुमेरा शेखचा 6-2, 7-6(5) असा टायब्रेकमध्ये पराभव करत सनसनाटी निकालाची नोंद केली. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या महाराष्ट्राच्या रिचा चौगुलेने लकी लुझर ठरलेल्या कर्नाटकच्या शरण्या शेट्टीचा 1-6, 6-3, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर पिछाडीवरून जोरदार पुनरागमन करत रिचाने पुढील दोन्ही सेट जिंकून सामन्यात विजय मिळवला.

अव्वल मानांकित गुजरातच्या वैदेही चौधरीने महाराष्ट्राच्या बेला ताम्हणकरचा 6-0, 6-3 असा सहज पराभव केला. महाराष्ट्राच्या आकांक्षा नित्तुरेने आंध्र प्रदेशच्या अनुशा कोंडावीती हीचा 1-6, 6-2, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. महाराष्ट्राच्या तेजस्वी काटेने कर्नाटकच्या शितल शेट्टीचा 6-2, 6-2 असा एकतर्फी पराभव करून विजयी सलामी दिली.

तामिळनाडूच्या दुस-या मानांकीत निथ्याराज बाबुराजने लकी लुझर महाराष्ट्राच्या हृदया शहाचा 6-4, 6-1 तर मध्य प्रदेशच्या तिस-या मानांकीत सारा यादवने तमिळनाडूच्या निधित्रा राजमोहन हिचा 6-1, 6-4 असा सहज पराभव केला. कर्नाटकच्या सोहा सादिकने महाराष्ट्राच्या वैदेही काटकरचा 6-0, 6-2 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत धडक मारली.

स्पर्धेचे उद्घाटन पुना क्लबचे अध्यक्ष राहुल ढोले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुना क्लबचे उपाध्यक्ष नितिन देसाई, स्पर्धा संचालक व पुना क्लबचे टेनिस विभागाचे सचिव सचिन राठी, पुना क्लबच्या क्रीडा विभागाचे चेअरमन शशांक हळबे व लेफ्टनंट कर्नल सरकार, सुपरवायझर वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- पहिली फेरी: महिला गट:

वैदेही चौधरी(गुजरात)(1) वि.वि.बेला ताम्हणकर(महाराष्ट्र)6-0, 6-3;

निथ्याराज बाबुराज(तामिळनाडू)(2) वि.वि हृदया शहा(महाराष्ट्र) 6-4, 6-1

सारा यादव(मध्य प्रदेश)(3) वि.वि निधित्रा राजमोहन(तमिळनाडू) 6-1, 6-4

सोहा सादिक(कर्नाटक)(4) वि.वि वैदेही काटकर(महाराष्ट्र)6-0, 6-2

आरती मुनीयन(तमिळनाडू) वि.वि हुमेरा शेख(तेलंगणा)(5) 6-2, 7-6(5)

निधि चिलुमुला(तेलंगणा)(7) वि.वि साई देदिप्या(तेलंगणा) 6-2, 6-0

वंशिका चौधरी(उत्तर प्रदेश)(8) वि.वि वैदेही काटकर(महाराष्ट्र) 5-7, 6-3, 7-5

अविका सागवाल(दिल्ली) वि.वि. सोनाशे भटनागर(कर्नाटक)6-2, 6-3;

श्रेया तातावर्थी(आंध्र प्रदेश) वि.वि.सृष्टी दास(महाराष्ट्र)6-2, 6-2;

श्राव्या शिवाणी चिलाकलापुडी(तेलंगणा)वि.वि.ईश्वरी माथेरे(महाराष्ट्र)6-3, 6-3

आकांक्षा नित्तुरे(महाराष्ट्र) वि.वि अनुशा कोंडावीती(आंध्र प्रदेश) 1-6, 6-2, 6-4

अवंतीका रेवानुर(तमिळनाडू) वि.वि शिल्पी स्वरूपा दास(ओडीसा) 6-2, 6-0

तेजस्वी काटे(महाराष्ट्र) वि.वि शितल शेट्टी(कर्नाटक) 6-2, 6-2

रिचा चौगुले(महाराष्ट्र) वि.वि. शरण्या शेट्टी(कर्नाटक) 1-6, 6-3, 6-2