हा खेळाडू बनला पहिला बांगलादेशी ज्याने केले दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय शतक

आज बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात मुशफिकूर रहीमने ११६ चेंडूत ११० धावांची खेळी केली. त्याच्या शतकाच्या जोरावर बांगलादेशने ५० षटकांत २७८ धावा केल्या.

याबरोबर मुशफिकूर रहीम हा पहिला बांगलादेशी खेळाडू बनला ज्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक केले.

यापूर्वी सौम्या सरकारने आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या होत्या. तो ९० धावांवर बाद झाला होता.

आजपर्यंत बांगलादेश आफ्रिकेविरुद्ध १२ कसोटी, १८ वनडे आणि ४ टी२० सामने खेळला आहे. परंतु आज प्रथमच या संघाकडून एखाद्या खेळाडूने आफ्रिकेविरुद्ध शतकी खेळी केली.