एशिया कप २०१८: शतकी खेळी करणाऱ्या मुशफिकूर रहिमने धोनी, संगकारालाही टाकले मागे

दुबई। शनिवारपासून सुरु झालेल्या एशिया कप 2018 स्पर्धेत पहिला सामना श्रीलंका विरुद्ध बांगलादेश संघात पार पडला. या सामन्यात बांगलादेशने 137 धावांनी विजय मिळवला. बांगलादेशच्या या विजयात त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकूर रहिमने शतक करत मोलाचा वाटा उचलला.

त्याने या सामन्यात 150 चेंडूत 144 धावा केल्या. यात त्याने 11 चौकार आणि 4 षटकार मारले. याबरोबरच त्याने एक खास विक्रमही रचला आहे. त्याच्या 144 धावा या एशिया कपच्या इतिहासात यष्टीरक्षक फलंदाजाने एका सामन्यात केलेल्या सर्वोच्च वैयक्तिक धावा आहेत.

याआधी हा विक्रम श्रीलंकेचा माजी दिग्गज यष्टीरक्षक कुमार संगकाराच्या नावावर होता. त्याने 2008 ला कराची येथे बांगलाेदशविरुद्ध 121 धावा केल्या होत्या. पण आता हा विक्रम रहिमने मोडला आहे.

या विक्रमाच्या यादीत भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने हाँग काँगविरुद्ध 2008ला कराची येथे नाबाद 109 धावा केल्या होत्या.

आत्तापर्यंत एशिया कपमध्ये यष्टीरक्षकांनी 9 वेळा शतके केली आहेत. यातील 4 शतके तर एकट्या संगकाराने केली आहेत, तर राहुल द्रविड, एमएस धोनी, उमर अकमल, अनामुल हक आणि रहिम यांनी प्रत्येकी एक शतक केले आहे.

याबरोबरच रहिमने आणखी एक खास पराक्रम केला आहे. त्याने एशिया कपमध्ये एका सामन्यात वैयक्तिक सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत युनुस खानबरोबर दुसरे स्थान मिळवले आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली आहे. त्याने पाकिस्तान विरुद्ध 2012 ला 183 धावांची खेळी केली होती.

एशिया कपमध्ये एका सामन्यात सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारे यष्टीरक्षक-

144 धावा – मुशफिकूर रहिम

121 धावा – कुमार संगकारा

109* धावा – एमएस धोनी

104 धावा – राहुल द्रविड

102* धावा – उमर अकमल

100 धावा – अनामुल हक

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

SAFF Cup Final: भारताला पराभूत करत मालदीवने जिंकला सॅफ कप

एशिया कप ही विश्वचषकाच्या दृष्टीने संघबांधणीसाठी उत्तम संधी – रोहित शर्मा

रिषभ पंतने इंग्लंड विरुद्ध शेवटच्या कसोटीत केलेला हा विक्रम राहिला दुर्लक्षित

ओळख एशिया कप २०१८ मधील ‘अ’ गटाची