हौशी टेनिस लीग स्पर्धेत एमडब्लूटीए अ, गोल्डन बॉईज संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित आयकॉन- अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत एमडब्लूटीए अ, गोल्डन बॉईज या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत गोल्डन बॉईज संघाने एमडब्लूटीए ब 15-13असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. 80अधिक गटात एमडब्लूटीए ब संघाच्या गजानन कुलकर्णी व मंदार मेहेंदळे या जोडीने गोल्डन बॉईजच्या अमित पाटणकर व केदार पाठक यांचा 6-3 असा पराभव केला.

त्यानंतर खुल्या गटात गोल्डन बॉईजच्या आशिष पुंगलियाने अमित शर्माच्या साथीत एमडब्लूटीए ब संघाच्या आदित्य जोशी व श्वेतल शहा यांचा 6-4 असा तर, मुकुंद जोशी व आदित्य खटोड यांनी आशिष डिके व उमेश भिडे यांचा 6-3 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.

एमडब्लूटीए अ संघाने पीसीएलटीए संघाचा 13-12 असा संघर्षपूर्ण पराभव केला. विजयी संघाकडून निलेश ओस्तवाल, जयदीप वाकणकर, विवेक खडगे, आशिष मणियार यांनी अफलातून कामगिरी बजावली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

एमडब्लूटीए अ वि.वि.पीसीएलटीए 13-12(80अधिक गट: निलेश ओस्तवाल/जयदीप वाकणकर वि.वि.रवी जौकनी/गिरीश कुलकर्णी 6-1;खुला गट: विवेक खडगे/आशिष मणियार वि.वि.कल्पेश मकनी/ब्रुनो रुबीनो 6-5(3); निशांत भागिया/आनंद कोटमेस पराभूत वि.राजेश मित्तल/अनंत गुप्ता 1-6);

गोल्डन बॉईज वि.वि.एमडब्लूटीए ब 15-13(80अधिक गट:अमित पाटणकर/केदार पाठक पराभूत वि.गजानन कुलकर्णी/मंदार मेहेंदळे 3-6; खुला गट: आशिष पुंगलिया/अमित शर्मा वि.वि.आदित्य जोशी/श्वेतल शहा 6-4; मुकुंद जोशी/आदित्य खटोड वि.वि.आशिष डिके/उमेश भिडे 6-3).