Pune: एन. श्रीराम बालाजी केपीआयटी एमएसएलटीए चॅलेंजर स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत

0 402

पुणे । येथे आजपासून सुरु झालेल्या केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या एन. श्रीराम बालाजीने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याने इजिप्तच्या करीम मोहम्मद माँमौनला ६-४, ६-२ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. 

मुख्य स्पर्धेला आज सुरुवात झाली तेव्हा सेन्टर कोर्टवर हा सामना झाला. करीम मोहम्मद माँमौनला जागतिक क्रमवारीत २३५व्या स्थानी आहे. 

अन्य सामन्यात सिद्धार्थ रावतचा फ्रान्सच्या ऍन्टीनो एसकॉफीरने २-६, ३-६ असा पराभव केला. ऍन्टीनो एसकॉफीर जागतिक क्रमवारीत ४२१व्या स्थानी आहे तर सिद्धार्थ रावत ५२७व्या स्थानी आहे. 

Comments
Loading...
%d bloggers like this: