एटीपी फायनल्स: नदाल- गॉफिन आज आमने सामने

लंडन । कालपासून येथे सुरु झालेल्या एटीपी फायनल्स स्पर्धेत आज स्पेनच्या राफेल नदालला बेल्जियमच्या डेविड गॉफिनचा सामना करावा लागेल.

नदाल सध्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असून गॉफिन ७व्या स्थानी आहे. नदाल आपल्या पहिल्या एटीपी फायनल्स विजेतेपदासाठी उत्सुक आहे. नदाल या स्पर्धेत २०१० आणि २०१३ साली उपविजेता ठरला आहे. त्याने ८व्यांदा या स्पर्धेत भाग घेतला असून त्याच्या कारकिर्दीत ह्या एका विजेतेपदाने त्याला सतत हुलकावणी दिली आहे.

गॉफिन आणि नदाल आजपर्यंत दोन वेळा समोरासमोर आले असून त्यात दोन्ही वेळा नदालने गॉफिनला पराभूत केले आहे. गॉफिन यावर्षी ५२ सामने जिंकला असून २२ सामने पराभूत झाला आहे. त्याच्या ह्या चांगल्या कामगिरीचे फळ म्हणजे ८ वर्षात तो प्रथमच या स्पर्धेत खेळत आहे.