राफेल नदालने क्ले कोर्टवरील 400 वा विजय साजरा करत रचला मोठा विक्रम

बार्सिलोना। क्ले कोर्ट किंग अशी ओळख असणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालने काल बार्सिलोना ओपेनच्या उपांत्य सामन्यात बेल्जियमच्या डेविड गॉफीनवर विजय मिळवून क्ले कोर्टवरील 400 वा विजय साजरा केला. असे करणारा तो फक्त चौथा खेळाडू आहे. 

तसेच नदालने क्ले कोर्टवर सलग 44 सेट आणि  सलग 18 सामने जिंकण्याचा पराक्रमही केला आहे. 

त्याने बार्सिलोना ओपेनच्या उपांत्य सामन्यात गॉफीनला 6-4, 6-0 असे सरळ सेचमध्ये पराभूत करत 11 व्यांदा बार्सिलोना ओपेनची अंतिम फेरी गाठली आहे. 

अंतिम फेरीत त्याचा सामना ग्रीकच्या 19 वर्षीय स्टिफानोस त्सित्सीपा विरूद्ध आज होणार आहे. आत्तापर्यंत नदालले बार्सिलोना ओपेनमध्ये खेळलेल्या प्रत्येक अंतिम फेरीत विजय मिळवला आहे.  

त्यामुळे आजही त्याच्या चाहत्यांना त्याच्याकूडन अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. जर नदालने आज अंतिम फेरीत विजय मिळवला तर तो बार्सिलोना ओपेन स्पर्धा ११व्यांदा जिंकण्याचा मोठा विक्रम करेल. 

याआधीच त्याने मागच्या आठवड्यात झालेल्या कार्लो मास्टर्स स्पर्धेचे ११व्यांदा विजेतेपद मिळवले होते आणि कोणतीही स्पर्धा ११वेळा जिंकणारा जगातील पहिला टेनिसपटू होण्याचा मान मिळवला होता. 

बार्सिलोना ओपेनच्या अंतिम सामन्यात  नदालचा प्रतिस्पर्धी असणाऱ्या स्टिफानोस त्सित्सीपाने  उपांत्य सामन्यात जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानी असणाऱ्या पाब्लो कॅरेनो बस्टाचा 7-5,6-3 असा पराभव केला आहे. 

स्टिफानोस त्सित्सीपा 1973 नंतरचा एटीपी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिलाच ग्रीक खेळाडू ठरला आहे.  याआधी निकोलस कलोगरोपोलोस हे ग्रीकचे टेनिसपटू 1973 मध्ये दे मोईनेस ओपनच्या अंतिम फेरीत पोहचले होते. 

महत्त्वाच्या बातम्या –

ऑस्ट्रेलियाच्या या शहरातून मिळाले ३ विश्वचषक विजेते खेळाडू

IPL 2018: आज राजस्थान-हैद्राबाद आमने-सामने

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४- दैव देते, कर्म नेते!!

‘कॅप्टन कूल’ एमएस धोनीने केला हा खास विक्रम

नव्या कर्णधाराने टोलावलेला चेंडू पडला माजी कर्णधाराच्या समोर, पुढे काय घडले पहाच