स्पेनच्या राफेल नदालकडून मोठा विक्रम

पॅरिस । स्पेनचा महान टेनिसपटू राफेल नदाल एटीपी क्रमवारीत २०१७च्या अखेरीस अव्वल स्थानी कायम राहणार आहे. पॅरिस मास्टर्स स्पर्धेत त्याने चिंग हुयानला पराभूत करत यावर शिक्कामोर्तब केले.

३१ वर्षीय नदाल हा जगातील वर्षअखेरीस अव्वल स्थानी राहणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरणार आहे. एटीपी क्रमवारीला १९७३ साली सुरुवात झाली. तेव्हापासून कोणत्याही खेळाडूला ३०व्या वयानंतर असे करता आलेले नाही.

यापूर्वी नदालने २००८, २०१० आणि २०१३मध्ये अशी कामगिरी केली होती.

फेडररने पॅरिस मास्टर्स स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे नदालला केवळ एका विजयची गरज होती ज्यामुळे त्याचे वर्षअखेरीस अव्वल स्थान कायम राहणार होते.

नदाल पॅरिस मास्टर्स स्पर्धा जिंकून कारकिर्दीतील विक्रमी ३१वे एटीपी वर्ल्ड टूर मास्टर १०००चे विजेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे.