प्रो कबड्डी: आजपासून मुक्कामपोस्ट नागपूर

प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमातिल हैद्राबाद येथील सामने संपले आहेत. प्रो कबड्डी आपला मुक्काम हैदराबाद येथून हलवून नागपूरला रवाना झाली आहे. नागपूर शहराचा स्वतःचा संघ नाही पण बेंगळुरु बुल्स संघाचे या मोसमासाठीचे घर हे नागपूर शहर असणार आहे.

बेंगळुरू बुल्स संघ दरवर्षी त्यांचे सामने हे त्यांच्या घरच्या म्हणजे बेंगळुरूच्या ‘ श्री कांतीराव स्टेडियम, बंगळूर’ येथे खेळत असतो. पण काही कारणांनी हे मैदान या वर्षी उपलब्ध होऊ शकले नाही आणि म्हणून नियोजन समितीने त्यांना नागपूर येथील मैदान दिले आहे. बेंगळुरू बुल्स संघाचे घरचे सर्व पूर्व नियोजित सामने आता नागपूर येथे होणार आहे.

प्रो कबड्डी स्पर्धेतील हेद्राबाद येथील सामन्याला तेथील पेक्षकांनी खूप पाठिंबा दिला होता, पण त्यांचा संघ तेलगू टायटन्स पहिला सामना वगळता बाकीचे सामने जिंकू शकला नव्हता. अगोदरच महाराष्ट्राचे दोन संघ या प्रो कबडीमध्ये खेळत असल्याने बंगळुरू बुल्स संघाला प्रेक्षकांचा किती पाठिंबा मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.