अंकुर स्पोर्ट्स क्लब (पुरुष गट ) व राजमाता जिजाऊ संघाने (महिला गट ) पटकावला नामदार चषक

पुणे । अजय तांबट मित्र परिवारातर्फे सणस मैदानावर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत (नामदार चषक ) मुंबईच्या अंकुर स्पोर्ट्स क्लबने पुरुष गटात तर, पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने महिला गटात रविवारी रात्री झालेल्या अंतिम सामन्यात आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करीत अंतिम फेरी जिंकली . त्याचबरोबर नामदार चषकावर आपले नावही कोरले. या दोन्ही विजेत्या संघाना प्रत्येकी रोख १ लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे पुरस्कार देण्यात आले .

काल रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात अंकुर स्पोर्ट्स क्लब व मुंबईच्याच स्वस्तिक क्लब मध्ये चुरशीचा सामना रंगला अंकुश स्पोर्ट्स क्लबने स्वस्तिकची २४-२१ असा तीन गुणांनी चुरशीच्या सामन्या त पराभव केला. मध्यंतरापर्यंत अंकुर सांग १४-७ असा आघाडीवर होता . परंतु स्वस्तिकच्या खेळाडूंनी चांगला खेळ करत सामन्यात रंगत आणली एकवेळ दोन्ही संघात १७ व १८ गुणांवर बरोबरी झाली होती . परंतु नंतर अंकुरच्या सुशांत साहिल ,अभिजित कदम , मिलिंद कोलते या खेळाडूंनी जोमंदारपणे खेळ केला आणि विजयश्री खेचून आणली .

स्वस्तिककडून. निलेश शिंदे , हरिदास भायताडे व अभिषेक चव्हाण यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली . परंतु ते संघाचा पराभव चुरशीच्या सामन्यात टाळू शकले नाही .

महिलांचा अंतिम सामना मात्र एकतर्फीच झाला . पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने सायली किरपाळे , स्नेहल शिंदे, पल्लवी जमदाडे , व काजल जाधव यांच्या बहारदार खेळाच्या जोरावर ,पुण्याच्याच सुवर्णयुग संघाचा ३१–१० असा दणदणीत पराभव केला . सुवर्णयुगकडून शिवानी जोगण व स्वाती कांबळे यांनी चांगले प्रयत्न केले .

महिला गटात स्नेहल शिंदे हिला सर्वोत्कृष्ट खेळाडू , चढाईसाठी स्वाती कंधारे , सर्वोत्कृष्ट पकडसाठी दिव्या गोगावले याना पुरस्कार प्रदान करण्यात आले . तर पुरुष गटात निलेश शिंदे , शशांत साहिल , अजिंक्य कापरे , याना सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळाला .

स्पर्धेतील विजेते व उपविजेत्याना पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या बक्षिसे देण्यात आली याप्रसंगी खासदार अनिल शिरोळे , सयोंजक अजय तांबट , नगरसेवक राजेश येनपुरे , नगरसेविका आरती कोंढरे ,जेष्ठ खेळाडू शांताराम जाधव, मधुकर नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या:

जे कोणत्याही आशियाई कर्णधाराला जमले नाही ते विराट कोहलीने करुन दाखवले!

अॅडलेड कसोटी जिंकत विराट कोहलीच्या टीम इंडियाने घडवला इतिहास

अॅडलेड कसोटीत यष्टीरक्षक रिषभ पंत चमकला, केले हे खास विक्रम