लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेत नमिश हूड, प्रिशा शिंदे, अवनिश चाफळेला विजेतेपद

पुणे । पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेत नमिश हूड, प्रिशा शिंदे, अवनिश चाफळे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

आरपीटीए टेनिस कोर्ट,पाषाण येथे पार पडलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत 8वर्षाखालील मिश्र गटात अव्वल मानांकित नमिश हूड याने दुसऱ्या मानांकितआर्यन कीर्तनेचा 7-3असा पराभव करून विजेतेपद पटकावले. नमिश हा डीएव्ही पब्लिक शाळेत दुसरी इयत्तेत शिकत असून फ्युचर प्रो टेनिस अकादमी येथे सराव करतो. त्याचे या वर्षातील या गटांतील तिसरे विजेतेपद आहे.

10वर्षाखालील मुलींच्या गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित प्रिशा शिंदे हिने आपली विजयी मालिका कायम ठेवत वैष्णवी सिंगचा 7-5असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले.

प्रिशा ही संस्कृती शाळेत चौथी इयत्तेत शिकत असून सोलारिस क्लब येथे प्रशिक्षक रवींद्र पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत तिसऱ्या मानांकित अवनिश चाफळे याने तेज ओक याचा 7-1असा एकतर्फी पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले.

अवनिश हा विखे पाटील शाळेत चौथी इयत्तेत शिकत असून संदीप कीर्तने टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक संदीप कीर्तने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आरपीटीए टेनिस कोर्टचे वरिष्ठ प्रशिक्षक रवींद्र पांडे आणि मुख्य प्रशिक्षक नितीन गावसकर यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: 8वर्षाखालील मिश्र गट: उपांत्य फेरी: नमिश हूड(1)वि.वि.रित्सा कोंडकर(4)6-1; आर्यन कीर्तने(2)वि.वि.नीरज जोर्वेकर6-5(7-5);

अंतिम फेरी: नमिश हूड(1)वि.वि.आर्यन कीर्तने(2)7-3

10वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी: वैष्णवी सिंग वि.वि.रित्सा कोंडकर(4)6-1;प्रिशा शिंदे(2)वि.वि.काव्या देशमुख 6-3;

अंतिम फेरी: प्रिशा शिंदे(2)वि.वि. वैष्णवी सिंग7-5;

10वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी: अवनिश चाफळे(3)वि.वि.सक्षम भन्साळी(1) 6-3; तेज ओक वि.वि.अमन शहा6-4;

अंतिम फेरी: अवनिश चाफळे(3)वि.वि.तेज ओक 7-1.