14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत युवान नांदल, आयुष्मान अरजेरिया, कुंदना भंडारू, श्रृती अहलावत यांचा अंतिम फेरीत प्रवेश

दुहेरीत दीप मुनीम व आयुष भट, राधिका महाजन व अंजली राठी यांना विजेतेपद

औरंगाबाद:  एड्युरन्स्‌ मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर(इएमएमटीसी)यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए – योनेक्स्‌ सनराईज्‌ इएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत हरियाणाच्या आठव्या मानांकीत युवान नांदलने महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकीत  अर्जुन गोहडचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

इएमएमटीसी टेनिस कोर्ट,डिव्हिजनल स्पोर्टस्‌ कॉम्पलेक्स्‌ येथे  सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या लढतीत मुलांच्या गटात हरियाणाच्या आठव्या मानांकीत युवान नांदलने पहिल्या सेटमध्ये पराभव पत्करत सामन्यात यशस्वी पुनरागमन केले व आपली विजयी मालीका कायम राखत महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकीत अर्जुन गोहडचा 5-7, 6-3, 6-2 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. संघर्षपुर्ण लढतीत मध्यप्रदेशच्या दुस-या मानांकीत आयुष्मान अरजेरियाने मध्यप्रदेशच्या तिस-या मानांकीत दीप मुनीमचा 7-6(6),6-7(3),6-4 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली.

मुलींच्या गटात तामिळनाडूच्या चौदाव्या मानांकीत कुंदना भंडारूने कर्नाटकच्या सुहिता मारुरीचा 6-4, 6-2 असा तर पाचव्या मानांकीत श्रृती अहलावतने महाराष्ट्राच्या दुस-या मानांकीत परी सिंगचा 6-2, 6-1 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

दुहेरी गटात विजेतेपदासाठीच्या लढतीत मुलांच्या गटात दीप मुनीम व आयुष भट यांनी आयुष्मान अरजेरिया  व युवान नांदल या जोडीचा  6-0, 6-2 असा सहज पराभव करत दुहेरीचे विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात
राधिका महाजन व अंजली राठी यांनी अपुर्वा वेमुरी व अभया वेमुरी यांचा 3-6, 6-4, 10-6असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण  एड्युरन्स्‌ ग्रुपचे सेक्युरिटी हेड कैलाश मोहिते, कुमकुम चौधरी, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एआयटीए सुपरवायझर वैशाली शेकटकर, डॉ.अश्विनी जैस्वाल, आशुतोष मिश्रा, गजेंद्र भोसले आणि प्रवीण गायसमुद्रे आदी मान्यवर उपस्थित होते

स्पर्धेचा सविस्तर निकाल:एकेरी गट उपांत्य फेरी: मुले:
युवान नांदल(हरियाणा)(8)वि.वि.  अर्जुन गोहड(महा)(4)5-7, 6-3, 6-2
आयुष्मान अरजेरिया(मध्यप्रदेश)(2)  दीप मुनीम(मध्यप्रदेश)(3)7-6(6),6-7(3),6-4
एकेरी गट उपांत्य फेरी: मुली:
कुंदना भंडारू(तामिळनाडू)(14) वि.वि. सुहिता मारुरी(कर्नाटक) 6-4, 6-2
श्रृती अहलावत(5) वि.वि  परी सिंग(महा)(2)6-2, 6-1
दुहेरी गट- अंतिम फेरी- मुले
दीप मुनीम/ आयुष भट(1) वि.वि आयुष्मान अरजेरिया /युवान नांदल(2) 6-0, 6-2
दुहेरी गट-  अंतिम   फेरी- मुली
राधिका महाजन/अंजली राठी  वि.वि.अपुर्वा वेमुरी/अभया वेमुरी 3-6, 6-4, 10-6.