नाशिक सायकलिस्टची एनआरएम दिवाळी फेस्टिवल राईड उत्साहात

नाशिक: नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या एनआरएम अर्थात नाशिक रँडोनर्स मायलर्स या उपक्रमाची 23वी एनआरएम फेस्टिवल राईड रविवारी (दि. 11) उत्साहात पार पडली. नाशिक ते वाघेरे ही 40 किमीची मिनी राईड तसेच नाशिक ते वाघेरे ते पुन्हा नाशिक या मार्गावर 80 किमीची फुल राईड या दोन प्रकाराच्या राईड मध्ये एकूण 53 सायकलिस्टने सहभाग नोंदविला. पैकी 41 सायकलिस्टने ही राईड पूर्ण केली. ११ सायक्लिस्टस् हे नवीन रायडर होते.
रविवारी (दि. 11) सकाळी सहा वाजता गंगापूर नाका, फायरफॉक्स शोरूम गंगापूर नाका येथून मोहिंदर सिंग भारज यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करण्यात आले. बोचरी थंडी आणि सुंदर अश्या नयनरम्य वातावरणात सायकलिस्टने राईड साठी सुरुवात केली. या राईडमध्ये नाशिक जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक तसेच गीता चव्हाण (डीएसपी) यांनी सहभाग घेत राईड पूर्ण केली.

एनआरएमचे हे दुसरे वर्ष असून 2019च्या सुरुवातीला होणाऱ्या नाशिक पेलेटॉन तसेच ऑडेक्स इंडियाच्या बीआरएम राईड्स मध्ये सहभागी होण्याची तयारी म्हणून एनआरएमचे महत्व वाढले आहे. एनआरएमची 24वी राईड 9 डिसेंबर रोजी गोणार आहे. नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया यांच्या मार्गदर्शनाखाली नीता नारंग, सोफिया कपाडिया, नितीन वानखेडे एनआरएम राईड्सच्या आयोजनाची जबाबदारी पार पाडत आहेत.