यावर्षी सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे खेळाडू

यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सार्वधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या नेथन लायनने भारताच्या रवींद्र जडेजा आणि आर अश्विनला पाठीमागे टाकले आहे.

यावर्षी त्याने ७ सामन्यात २२.४०च्या सरासरीने ४५ विकेट्स घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर रवींद्र जडेजा असून त्याने ७ सामन्यात २२.४०च्या सरासरीने ४४ विकेट्स तर तिसऱ्या स्थानावरील आर अश्विन अश्विनने २६.९५ च्या सरासरीने ४४ विकेट्स घेतल्या आहेत.

बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत लायनने पहिल्या सामन्यात ९ विकेट्स तर दुसऱ्या सामन्यात १२ विकेट्स घेऊन हा विक्रम केला आहे.

यावर्षी कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडू
४५ – नेथन लायन   । सामने- ७
४४- रवींद्र जडेजा     । सामने- ७
४४- आर अश्विन    । सामने- ८
३९- कागिसो रबाडा । सामने- ८
३५- केशव महाराज । सामने- ७