विराट कोहलीची कसोटीमध्ये या गोलंदाजाने केली आहे सर्वाधिक वेळा शिकार

अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात अॅडलेड ओव्हल मैदानात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाचा डाव तिसऱ्या दिवशी(8 डिसेंबर) 235 धावांवर संपुष्टात आला.

त्यामुळे भारतीय संघाने 15 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या सत्रात दुसऱ्या डावात फलंदाजीला सुरुवात केली आहे.

या डावात भारताचे मुरली विजय आणि केएल राहुल यांनी दुसऱ्या सत्रातच चांगल्या सुरुवातीनंतर विकेट गमावली आहे. त्यानंतर भारताकडून चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीने डाव सांभाळताना तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी  केली आहे.

पण ही भागीदारी रंगत असताना आॅस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियानने कोहलीला 34 धावांवर असताना बाद केले. कोहलीचा झेल शॉर्टलेगला उभ्या असणाऱ्या अॅरॉन फिंचने घेतला. लायनने कोहलीला बाद करण्याची ही कसोटी क्रिकेटमधील सहावी वेळ होती.

त्यामुळे आता कसोटीत कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रम नॅथन लायनच्या नावावर झाला आहे. हा विक्रम करताना लायनने इंग्लंडचे वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडला मागे टाकले आहे.

अँडरसन आणि ब्रॉड यांनी विराटला कसोटीत प्रत्येकी 5 वेळा बाद केले आहे. त्यामुळे ते विराटला कसोटीत सर्वाधिक वेळा बाद करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

कोहली बरोबरच लायनने कसोटीत अजिंक्य रहाणे, इशांत शर्मालाही 6 वेळा बाद केले आहे. तसेच त्याने भारतीय फलंदाजांमध्ये सर्वाधिक वेळा चेतेश्वर पुजाराला बाद केले आहे. पुजारा लायनच्या गोलंदाजीवर कसोटी क्रिकेटमध्ये 7 वेळा बाद झाला आहे.

त्याचबरोबर लायनने भारताच्या रोहित शर्मालाही कसोटीत 4 वेळा बाद केले आहे.

या सामन्यात भारताने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाखेर 3 बाद 151 धावा केल्या आहेत. पुजारा 40 धावांवर आणि रहाणे 1 धावेवर नाबाद खेळत आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करणारे गोलंदाज-

6 – नॅथन लियान

5 – जेम्स अँडरसन /स्टुअर्ट ब्रॉड

4 – पिटर सिडल/ आदील रशीद

महत्त्वाच्या बातम्या:

असा पराक्रम करणारा कोहली ठरला केवळ चौथा भारतीय

भारताच्या या बॅडमिंटनपटूचे मतदार यादीतून नाव झाले गायब

होय! कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात गंभीरची चमकदार कामगिरी

किंग कोहलीचा आॅस्ट्रेलियामध्ये विराट विक्रम