Video: इशांत शर्मासाठी ‘पार्ट-टाइम अंपायर’ झाला नॅथन लायन

पर्थ। ऑप्टस स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 146 धावांनी विजय मिळवला आहे. यामुळे चार सामन्यांची कसोटी मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आली आहे. भारताने अॅडलेडचा पहिला कसोटी सामना जिंकला आहे.

पर्थ येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये काही शाब्दिक चकमकी पाहायला मिळाल्या. पण सामनावीर ठरलेल्या ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायन हा त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. त्यामुळे त्याने या सामन्यात कोणत्याच खेळाडूसोबत चर्चेत न येता गोलंदाजीवर लक्ष केंद्रीत केले होते.

पाचव्या दिवशी भारताचा वेगवान इशांत शर्मा फलंदाजीला आला तेव्हा तो ऑफ स्टम्पला झाकून उभा होता. तेव्हा लायनने त्याला ‘तू ऑफ स्टम्पला झाकून फलंदाजी करणार आहेस का ?’ असे विचारले. यावर इशांतने ‘तू मला ऑफ स्टम्पला गोलंदाजी करणार आहे का ?’ असे उत्तर दिले.

या दोघांचा हा संवाद स्टम्पच्या माइकमध्ये रेकॉर्ड झाला. तसेच दोघांची ही चर्चा ऐकून पंच कुमार धर्मसेना यांनाही हसू आले.

इशांत रिषभ पंत बाद झाल्यावर फलंदाजीला आला होता. पंतला लायननेच बाद केले होते. इशांतही फार काळ खेळपट्टीवर टिकला नाही तो पाच चेंडू खेळून शुन्य धावेवर पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर कर्णदार आणि यष्टीरक्षक टिम पेनला झेल देऊन बाद झाला.

लायनने या सामन्यात 106 धावा देत 8 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने मायदेशात कसोटीमध्ये भारताविरुद्ध 9 सामन्यात 46 विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

ऑस्ट्रेलियन भूमीत टीम इंडियाविरुद्ध हा गोलंदाज ठरला सर्वात यशस्वी

Video: कोहली-पेन सोडा पण टीम इंडियाचेच हे दोन खेळाडू भिडले मैदानावर…