देश आधी… रोहितने चाहत्यांना मैदानातूनच दिला संदेश, पहा व्हिडीओ

,

मुंबई। भारत विरुद्ध विंडीज संघात सोमवारी (29 आॅक्टोबर) चौथा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताकडून रोहित शर्मा आणि अंबाती रायडूने शतक करत महत्त्वाची कामगिरी केली. तसेच याच सामन्यात रोहितने 3 झेलही घेतले.

रोहितने घरच्या मैदानावर खेळताना 137 चेंडूत 162 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 20 चौकार आणि 4 षटकार मारला. त्याचे हे 21 वे वनडे शतक आहे. त्याने घरच्या मैदानावर केलेल्या या कामगिरीमुळे त्याला प्रेक्षकांचाही जोरदार पाठींबा मिळाला.

पण पाठींबा देत ‘रोहित..रोहित’ असे ओरडणाऱ्या चाहत्यांना रोहितने ‘देश आधी आहे, त्यामुळे ‘इंडिया.. इंडिया’ असे म्हणा, असा संदेश दिला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत दिसते की रोहित त्याच्या चाहत्यांना त्याच्या जर्सीवरील इंडियाचे नाव दाखवून ‘इंडिया.. इंडिया’ असे म्हणा, असे सांगत आहे.

रोहित एकाच वनडे सामन्यात 150 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा आणि 3 झेल अशी कामगिरी करणारा रोहित जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्यामुळे त्याला या सामन्यात सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

भारताने या सामन्यात 224 धावांनी विजय मिळवत पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

२०१९ विश्वचषकात विराटला धोनीची गरज आहे, महान खेळाडूचे परखड मतं

ते सेलिब्रेशन २० वर्षीय खलील अहमदला पडले महागात

अपने धोनी को भूले तो नहीं

विराट म्हणतो, विश्वचषकासाठी धोनी नाही तर या खेळाडूची जागा संघात पक्की