राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: एच एस प्रणॉयची अंतिम फेरीत धडक

नागपूर। येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत या वर्षीचा अमेरिकन ओपनचा विजेता एच एस प्रणॉयने अंतिम सामन्यात धडक दिली आहे. पुरुष एकेरीमध्ये उपांत्य सामन्यात त्याने शुभंकर डे विरुद्ध विजय मिळवला.

या लढतीत शुभंकरने प्रणॉयला चांगली झुंज दिली. पहिल्या सेटच्या सुरवातीला दोघेही बरोबरीचा खेळ करत होते. परंतु नंतर प्रणॉयने सामन्यात वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आणि पहिला सेट २१-१४ असा जिंकला.

दुसऱ्या सेटमध्येही या दोंघांमधील चांगली लढत बघायला मिळाली. या सेट मध्ये एका क्षणी सामना १२-९ असा सुरु होता. त्यावेळी दोघेही एकमेकांना चांगली टक्कर देत होते. परंतु अखेर प्रणॉयने हा सेट २१-१७ असा जिंकून सामनाही जिंकला.