सायना नेहवालचा राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

0 301

नागपूर। भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज प्रवेश केला आहे. तिचा आज उपउपांत्यपूर्व फेरीत जी. वृषालीशी सामना झाला.

या सामन्यात सायनाने आपल्या अनुभवाच्या जोरावर २१-१२, २१-१० असा सरळ सेट मध्ये सहज विजय मिळवला. पहिल्या सेटमध्ये वृषालीने सायनाला झुंज देण्याचा प्रयत्न केला.परंतु सायनाने हा सेट जिंकत सामन्यात आघाडी मिळवली.

दुसऱ्या सेटमध्ये सायना ११-३ अशी ८ पॉइंट्सने आघाडीवर असताना वृषालीने सलग ५ पॉईंट्सची कमाई करत सायनाची १२-८ अशी आघाडी कमी केली. परंतु यात वृषालीला सातत्य राखण्यात अपयश आले. त्यामुळे सायनाने हा सेट सहज जिंकून सामना आपल्या नावावर केला.

 

Comments
Loading...
%d bloggers like this: