राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सायना नेहवाल अंतिम फेरीत

नागपूर। येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची फुलराणीने अंतिम फेरीत धडक मारली आहे. तिचा उपांत्य फेरीत सामना अरुण प्रभुदेसाई विरुद्ध झाला.

या ३० मिनिटे चाललेल्या लढतीत सायनाने अरुणावर २१-११,२१-१० असा सरळ सेटमध्ये सहज विजय मिळवला. सायनाने सुरवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व राखले होते. तिने अरुणाला एकही संधी दिली नाही.

सामन्याच्या दोन्हीही सेटमध्ये सायनाने अरुणाला स्थिर होऊ दिले नाही. अरुणाने लढतीतील दुसऱ्या सेटची सुरुवात चांगली केली होती परंतु अखेर सायनचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील अनुभव सामन्यात महत्वाचा ठरला.