- Advertisement -

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सायना नेहवालचा उपांत्य फेरीत प्रवेश

0 561

नागपूर। येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची फुलराणी सायना नेहवालने आजच्या दिवसातला दुसरा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

तिचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना आकर्षि कश्यप विरुद्ध झाला. या सामन्यात युवा आकर्षिने सायनाला चांगली लढत दिली. तिने सुरुवातीलाच सायनाविरुद्ध ४-१० अशी आघाडी घेतली होती. परंतु सायनाने सलग सहा पॉईंट्स जिंकत सामना ११-१० असा केला. अखेर अनुभवाच्या जोरावर सायनाने पहिला सेट २१-१७ असा जिंकला.

दुसऱ्या सेटमध्ये मात्र सायनाने पूर्णपणे वर्चस्व राखताना आकर्षिला एकही संधी दिली नाही. हा सेट सायनाने २१-१० असा जिंकून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Comments
Loading...
%d bloggers like this: