- Advertisement -

हे दोन वेगवान गोलंदाज दक्षिण आफ्रिकेला जाणार, भारतीय संघाला करणार सरावात मदत 

0 246

जोहान्सबर्ग । तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशा पिछाडीवर असणाऱ्या भारतीय संघाला सरावात मदत करण्यासाठी दोन वेगवान गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकेत बोलवण्यात आले आहे. त्यात दिल्लीकर नवदीप सैनी आणि मुंबईकर शार्दूल ठाकूरचा समावेश आहे. 

हे दोन गोलंदाज भारतीय संघातील फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाज करणार आहे. शार्दूल ठाकूर यानंतर दक्षिण आफ्रिकेतच थांबणार आहे कारण त्याच्या वनडे संघात समावेश आहे. 

भारतीय संघ २४ जानेवारीपासून जोहान्सबर्ग येथे सुरु होणार आहे. शेवटच्या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 

नवदीप सैनी आणि शार्दूल ठाकूर हे गोलंदाज शनिवारी भारतीय संघासोबत सराव करताना दिसतील. त्यामुळे त्यांना संघासोबत दोन दिवस सराव करायला मिळेल. 

भारतीय संघाला येथे सरावासाठी येथे चांगले गोलंदाज मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी त्याची तक्रार केल्यामुळे भारताकडून गोलंदाज बोलवण्यात आले आहेत. 

Comments
Loading...
%d bloggers like this: