१८ वर्षीय नवीन कुमारचा प्रो कबड्डीत विक्रमांचा विक्रम

प्रो कबड्डीत काल (२५ नोव्हेंबर) दबंग दिल्ली संघाचा हरियाना स्टिलर्सने ३४-२७ असा पराभव केला. या सामन्यात दिल्लीकडून खेळणाऱ्या नवीन कुमारने मोठा पराक्रम केला.

प्रो कबड्डीत १०० गुण केवळ रेडमधून घेणारा तो दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला. १३ सामन्यात त्याने या हंगामात १०७ गुण कमाई केली आहे. त्यातील १०३ गुण त्याने रेडिंगमधून घेतले आहेत.

कालच्या सामन्यात त्याने दबंग दिल्लीकडून १० गुणांची कमाई केली. त्याने याच हंगामात प्रो कबड्डीत पदार्पण केले आहे.

यापुर्वी सचिनने ५व्या हंगामात १५९ गुणांची कमाई रेडमधून केली होती.

६व्या हंगामात सर्वीधिक गुण रेडमधून  मिळवणारे खेळाडू- 

१५३- सिद्धार्थ देसाई, सामने- १४

१४६- परदिप नरवाल, सामने- १३

१४५- पवनकुमार शेरावत, सामने – १३

१३१- अजय ठाकूर, सामने- १३

१२५- विकास कंडोला, सामने- १५

१०४- सचिन, सामने- १३

१०३- नवीन कुमार, सामने १३

महत्त्वाच्या बातम्या:

विराट जगातील १११७ खेळाडूंना ठरला भारी, जाणून घ्या काय आहे कारण

कृणाल पंड्या आॅस्ट्रेलियात चमकला, केले हे खास विक्रम

हिटमॅन रोहित शर्मा आता या दिग्गजांमध्ये सामील