- Advertisement -

NBA: सर्वोत्कृष्ट खेळाडू कोबे ब्रायंटच्या ८ आणि २४ क्रमांकाच्या जर्सीला केले निवृत्त

0 1,133

एनबीएमधील लॉस एंजिल्स लेकर्स संघातील दिग्गज खेळाडू कोबे ब्रायंट वापरत असलेला जर्सी क्रमांक ८ आणि २४ यांना काल निवृत्त करण्यात आले. या जर्सीचा निवृत्तीचा कार्यक्रम सोमवारी रात्री पार पडला.

कोबे ब्रायंटने १९९६ मध्ये एनबीएमध्ये प्रदार्पण केले. २०१६ मध्ये त्याने निवृत्ती घेतली. एकूण २० वर्ष तो एनबीएमध्ये लॉस एंजिल्स लेकर्स संघाकडून खेळत होता.

या २० वर्षाच्या कारकिर्दीत एनबीएमधील अनेक पुरस्कार त्याने आपल्या नावे केले. एनबीए चॅम्पियनशिप, एनबीए ऑल स्टार, एनबीए सर्वात्कृष्ट खेळाडू पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्याने मिळवले.

लॉस एंजिल्स लेकर्स संघाने त्याने वापरलेल्या या जर्सीला निवृत्त करून त्याला दिलेल्या आदराचे सगळ्याच खेळाडूंनी कौतुक केले. तेसच लेब्रॉन जेम्स व अन्य खेळाडूंनी ब्रायंटला ट्विटरवरूनही शुभेच्छा दिल्या.

 

Comments
Loading...
%d bloggers like this: